
सुनील पाटील
कोल्हापूर : राज्यात दूध पावडरीचे उत्पादन कमी आणि मागणी जास्त अशी परिस्थिती होती. त्यामुळे दूध पावडरीला आणि पर्यायाने दूधाला चांगला दर मिळत होता. सध्या, राष्ट्रीय पातळीवरील दूध पावडरीला चांगला दर असताना महाराष्ट्रातील दूध पावडरीचे दर कमी होत आहेत. याचा जिल्ह्यातील दूध संघांना आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसणार आहे.