
कोल्हापूर : उद्योग, कृषी आणि सहकार याचा पाया कोल्हापुरात घातला गेला. याच जोरावर जिल्ह्याने विविध क्षेत्रांत प्रगती केली. आताही विविध शासकीय योजना, पर्यटन विकास आणि नवे उद्योग यांच्या माध्यमातून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.