
कोल्हापूर : ‘काँग्रेस व आम आदमी पक्षाला एकत्र यायला कोणी अडवले होते का? शिवसेनेच्या ठाकरे गटाचे संजय राऊत इतके महान नेते आहेत की, ते त्यांच्यात समझोता घडवू शकले नाहीत. त्यांना जादुच्या कांडीने रिझल्ट मिळतात, असे वाटत असेल, तर त्यांनी रोज सकाळी माध्यमांशी बोलण्यापूर्वी साधना करावी’, असा टोला उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे लगावला. शिवाजी विद्यापीठातील भुयारी मार्गाच्या उद्घाटनानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.