
Kolhapur Political News : ‘संपूर्ण हयातभर दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांनी कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेस पक्ष जिवंत ठेवण्यासाठी इमानेइतबारे पक्षाची सेवा केली. आता त्यांची मुले भवितव्याचा विचार करून अन्य पक्षांत प्रवेश करत आहेत. त्यावर त्यांना सहकार्य करता येणार नसेल, तर अपशकून करून अडथळा आणू नये. त्यांना आशीर्वाद द्यावेत’, असा सल्ला वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज आमदार सतेज पाटील यांना दिला.
विविध विषयांवर मंत्री मुश्रीफ यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच शक्तिपीठ महामार्गाची वाटचाल करणार आहोत. शेताशिवारात खर्डा-भाकर खाण्यासाठी सतेज पाटील यांनी नितीन राऊत यांनाही बोलवायला हवे होते.