केंद्रीयमंत्री ज्योतिरादित्य शिंदे हे सहकुटुंब दोन दिवस कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. काल त्यांचे आगमन झाले. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी त्यांचे स्वागत केले.
कोल्हापूर : ‘करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर (Ambabai Temple) व श्री क्षेत्र जोतिबा मंदिर विकासासाठी सरकारस्तरावर सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. यासाठी आवश्यक प्रस्ताव पाठवावेत’, असे केंद्रीय दूरसंचार व ईशान्य प्रदेश विकासमंत्री ज्योतिरादित्य शिंदे (Jyotiraditya Scindia) यांनी येथे सांगितले.