चॉकलेटचं आमिष दाखवून चिमुरडीवर अल्पवयीन मुलाकडून लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न; संतप्त जमावाचा पोलिस ठाण्यासमोर ठिय्या

एका गावात चिमुकलीवर (Minor Girl) अल्पवयीन मुलाकडून चॉकलेटचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला.
Kolhapur Crime News
Kolhapur Crime Newsesakal
Summary

याप्रकरणी पोलिसांनी पोक्सो कायद्यांतर्गत (POCSO Act) गुन्हा दाखल करून संबंधित अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.

गांधीनगर : करवीर (Karveer) तालुक्यातील एका गावात चिमुकलीवर (Minor Girl) अल्पवयीन मुलाकडून चॉकलेटचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकारानंतर संशयित अल्पवयीन मुलाला जमावाने पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर गांधीनगर पोलिस (Gandhinagar Police) ठाण्यासमोर नागरिकांचा प्रचंड मोठा जमाव जमला होता.

Kolhapur Crime News
कोयनेतील पाण्याचा वाद पेटणार; सातारा-सांगली लोकप्रतिनिधींमध्ये खडाजंगी, मंत्री देसाईंना केलं जातंय 'टार्गेट'

याप्रकरणी पोलिसांनी पोक्सो कायद्यांतर्गत (POCSO Act) गुन्हा दाखल करून संबंधित अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे, असे तपास अधिकारी सहाय्‍यक पोलिस निरीक्षक अर्जुन घोडे-पाटील यांनी सांगितले. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, घराशेजारी खेळत असलेल्या एका चिमुकलीला संबंधित अल्पवयीन मुलाने चॉकलेटचे आमिष दाखवून गच्चीवर नेले. यावेळी त्या मुलीची आई मुलीला शोधू लागली.

घराजवळील सीसीटीव्हीचे फुटेज तपासले असता मुलीला तो मुलगा जिन्यावरून नेत असल्याचे दिसले. लगेचच मुलीची आई आणि शेजारी गच्चीवर गेले. दोघांना पाहून मुलीच्या आईने आरडाओरडा केला. त्याने परिसरातील नागरिक जमले. त्यांनी संबंधित मुलाला पोलिस ठाण्यात आणले. तोपर्यंत ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे दुकाने बंद करून पोलिस ठाण्याकडे धाव घेतली. बघता बघता पोलिस ठाण्यासमोर शेकडो लोकांचा जमाव जमला.

Kolhapur Crime News
आनेवाडी टोलनाका वाद : आमदार शिवेंद्रराजेंसह 48 जणांची न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता, काय घडलं होतं 'कोजागरी'च्या रात्री?

सहाय्‍यक पोलिस निरीक्षक अर्जुन घोडेपाटील यांनी जमावाला समजावून सांगितले; परंतु गुन्हा दाखल होत नाही आणि लोकप्रतिनिधी, वरिष्ठ पोलिस अधिकारी येत नाहीत तोपर्यंत हलणार नाही, अशी भूमिका जमावाने घेतली. जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. दरम्यान, अप्पर पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील, पोलिस उपअधीक्षक संकेत गोसावी ठाण्यात आले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी जलद कृती दल पाचारण केले.

Kolhapur Crime News
प्रेम प्रकरणातून मुलाच्या वडिलांना विजेच्या खांबाला बांधून जीवघेणी मारहाण; इतकी हैवानियत येते कुठून?

यानंतर शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहाय्‍यक निरीक्षक पंकज गिरी, गोकुळ शिरगावचे सहाय्‍यक पोलिस निरीक्षक दिगंबर गायकवाड, कागलचे सहाय्‍यक पोलिस निरीक्षक करपे, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रवींद्र कळंबकर, आदींसह फौजफाटा दाखल झाला. दरम्यान, दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील, भाजपच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा शौमिका महाडिक यांनी संबंधित मुलीच्या पालकांना भेटून धीर दिला. यानंतर आमदार ऋतुराज पाटील, शौमिका महाडिक, पोलिस उपअधीक्षक संकेत गोसावी, सहाय्‍यक पोलिस निरीक्षक अर्जुन घोडे-पाटील, बजरंग दलाचे बंडा साळुंखे यांनी एका बैठकीत जमावाला शांततेचे आवाहन केले. पुढील तपास सहाय्‍यक पोलिस निरीक्षक अर्जुन घोडे-पाटील करत आहेत.

दिवसभरात

  • नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया

  • कारवाईसाठी पोलिस ठाण्यासमोर शेकडोंचा जमाव

  • दुकाने बंद ठेवत व्यापाऱ्यांकडून घटनेचा निषेध

  • नागरिकांच्या बैठकीत पोलिसांचे संयमाचे आवाहन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com