
esakal
ZP Kolhapur Politics : जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत दिग्गज नेत्यांचे वारसदार रिंगणात उतरवण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यासाठी नेत्यांकडून कार्यकर्त्यांच्या माध्यमातून चाचपणी सुरू आहे. विशेषतः खुल्या प्रवर्गातील गट व गणांवर या नेत्यांसह त्यांच्या वारसदारांचा डोळा आहे. प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर या हालचाली गतिमान होतील.