
Kolhapur Politics : मुलग्याला-मुलगी आणि मुलगीला मुलगा पसंत असल्याशिवाय त्यांचे लग्न होत नाही. एकतर्फी कोणालाही निर्णय घेता येत नाही. तसेच हद्दवाढीबाबत असून, हद्दवाढ होणार म्हणून एकतर्फी निर्णय घेऊन चालत नाही, तर ग्रामीण भागांतील नागरिकांनाही विश्वासात घ्यावे लागणार आहे. मंत्रिमंडळाची बैठक संपल्यानंतर हद्दवाढ हवी असलेल्या नेत्यांसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही मिनिटे चर्चा केली, याला बैठक म्हणता येत नाही. असे करवीरचे आमदार चंद्रदीप नरके यांनी सांगितले.
जिल्हा नियोजन समितीची बैठकीपूर्वी आमदार नरके यांनी हद्दवाढीबाबत भूमिका स्पष्ट केली. यामळे कोल्हापूर हद्दवाढीवरून शिंदे गटातील दोन आमदारांमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.