
MLA Court Hearing : राज्यपाल नियुक्त आमदारांची झालेली नियुक्ती रद्द करावी, पुढील नियुक्ती करू नये, यासाठीची सुनावणी आता कोल्हापुरातील सर्किट बेंचमध्ये होणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख माजी नगरसेवक सुनील मोदी यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका आता सर्किट बेंचमध्ये वर्ग करण्यात आली आहे. पुढील महिन्यात याची सुनावणी होणार असल्याची माहिती मोदी यांनी दिली.