
‘शक्तिपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ आठ मार्च रोजी सकाळी ११ वाजता मुस्कॉन लॉन येथे मेळावा घेणार आहे. त्यासाठी खासदार धनंजय महाडिक यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व शेतकरी उपस्थित राहणार आहेत.’
कोल्हापूर : ‘स्वत:च्या अंघोळीसाठी शहरवासीयांच्या माथी गळकी थेटपाईपलाईन योजना मारलेल्या आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांनी स्वतः पालकमंत्री, मंत्री, आमदार असताना जिल्ह्याच्या विकासासाठी काय केले याचे आत्मपरीक्षण करावे’, असा प्रतिटोला राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) यांनी लगावला.