
Shaktipeeth Land Records: चंदगड मतदारसंघातून शक्तिपीठ महामार्ग जाण्यासाठी निघालेल्या समर्थन मोर्चात आमदार शिवाजीराव पाटील यांनी सातबारा उतारे जमा करण्यासाठी अनेक शेतकरी मोर्चात सहभागी असल्याचे सांगितले होते.
त्यासंदर्भात भाजपचेच पदाधिकारी संग्राम कुपेकर यांनी प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे यांच्याकडे त्याची माहिती मागितली. परंतु, २१ जुलैपर्यंत शक्तिपीठ महामार्ग आपल्या जमिनीतून जाण्याकरिता शेतकऱ्यांनी एकही सातबारा उतारा सादर केला नसल्याचे लेखी उत्तर काळबांडे यांनी दिले आहे.