
Shaktipeeth Highway Kolhapur : शक्तिपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ भारतीय जनता पक्षाकडून गडहिंग्लज येथे आमदार शिवाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली पदयात्रा काढण्यात आली. काही दिवसांपूर्वी शक्तिपीठ महामार्गाविरोधात गडहिंग्लज येथे सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाला प्रत्युत्तर म्हणून शक्तिपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ ही पदयात्रा काढण्यात आली. पदयात्रा दुपारी १२ नंतर रिलायन्स पेट्रोल पंप, संकेश्वर रोड ते प्रांत कार्यालयापर्यंत काढण्यात आली. शक्तिपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देऊन पदयात्रेची सांगता झाली.