कोल्हापूर-सांगलीतील तरूणांसाठी खासदार धैर्यशील माने यांनी केलीय 'ही' महत्वाची मागणी 

mp dhairyasheel mane demand for entry in sangli to kolhapur
mp dhairyasheel mane demand for entry in sangli to kolhapur

रुकडी : कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील नोकरदारांना दोन्ही जिल्ह्यामध्ये नोकरीसाठी येण्या-जाण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी कोल्हापूर जिल्हाधिकारी दौलत देसाई व सांगली जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्याकडे हातकणंगले लोकसभा मतदार संघाचे शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी पत्रकाव्दारे केली आहे.

कोल्हापुरच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सांगली -जिल्ह्यातील बहुतांश गावामधील अनेक तरुण कोल्हापूर जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीमध्ये नोकरीस आहेत. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातीलही बहुतांश गावामधील अनेक तरुण सांगली जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीमध्ये नोकरीस आहेत. सध्या अनेक कारखाने सुरु झाले आहेत. परंतु, कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा बंदी असल्यामुळे या तरुणांना नोकरीसाठी दोन्ही जिल्ह्यात येणे-जाण्यास अडचण निर्माण होत आहे. 

२२ मार्च पासून लॉकडाऊनमुळे उद्योगधंदे बंद असल्यामुळे हे नोकरदार घरी बसून होते. त्या काळात त्यांना पगार मिळाला नसल्यामुळे त्यांच्या समोर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. 


सध्या उद्योग सुरु झाल्यामुळे या नोकरदारांना कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी नोकरीस जाणे गरजेचे असल्यामुळे अशा युवकांना कोल्हापूर जिल्ह्यातून सांगली जिल्ह्यामध्ये व सांगली जिल्ह्यामधून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येणे-जाणेची परवानगी देणेसाठी योग्य ती कार्यवाही करुन सहकार्य करण्याची विनंती खासदार धैर्यशील माने यांनी कोल्हापूर व सांगली जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com