
कोल्हापूर : देशाची आणि महाराष्ट्राची विकासाची घौडदौड सुरू असतानाच कोल्हापूरच्या विकासात मात्र काही विघ्नसंतोषी मंडळी अडथळा निर्माण करत असल्याची टीका खासदार धनंजय महाडिक यांनी केली. कोणीही, कितीही विरोध केला तरी हद्दवाढ आणि शक्तिपीठ महामार्ग होणारच, असेही त्यांनी सांगितले.