खासदार संजय मंडलिक यांच्यासह पत्नी, मुलगा कोरोना बाधित

 MP Sanjay Mandlik wife vaishali mandlik and Son Virendra Mandlik covid infected in kolhapur
MP Sanjay Mandlik wife vaishali mandlik and Son Virendra Mandlik covid infected in kolhapur

कोल्हापूर : खासदार संजय मंडलिक यांच्यासह त्यांची पत्नी सौ वैशाली मंडलिक व त्यांचा मुलगा वीरेंद्र मंडलिक यांचा कोरोनाचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. काल रात्री उशिरा त्यांचा अहवाल  पॉझिटिव्ह  आला आहे. यापूर्वी आमदार प्रकाश आवाडे, आमदार ऋतुराज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव यांनाही कोरोनाची बाधा झाली आहे. आमदार जाधव यांच्या कुटुंबातील सहा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. कोरोना  विरोधातील लढाईत हे होते. त्रास जाणवू लागल्याने त्यांनी कुटुंबातील इतर सदस्यांचा स्वॅब दिला होता. आपली तब्येत चांगली असून संपर्कात असलेल्या लोकांनी काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले.

जिल्ह्यात ज्या प्रमाणे कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्याप्रमाणे कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत आहे.  जिल्ह्यात आज काल  दिवसभरात  तब्बल ७८१ रुग्ण कोरोनामुक्त होवून घरी गेले आहेत. हे आशादायक चित्र आहे. रुग्णांना वेळेत बेड मिळावेत, ऑक्‍सिजन पुरवठा व्हावा यासाठी जिल्हा प्रशासन व सीपीआर प्रशासन प्रयत्न करत आहेत.

जिल्ह्यात आज अखेर आजरा तालुक्‍यात ३१७, भुदरगड ४०२, चंदगड ४८१, गडहिंग्लज ४४२, गगनबावडा ३९, हातकणंगले २११६, करवीर २१३०, पन्हाळा ६१३, राधानगरी ४७९, शाहुवाडी 
४५४, शिरोळ ९५० कोरोना रुग्ण आढळले आहेत.
कोल्हापूर शहर व इचलकरंजी वगळता इतर तालुक्‍यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. तसेच, दररोज आढळणाऱ्या रुग्णांमध्येही घट झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून कोल्हापूर शहर आणि इचलकरंजी शहरावर लक्ष केंद्रीत करुन आवश्‍यक उपाय योजना केल्या 
जात आहेत.

संपादन - अर्चना बनगे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com