
MP Shahu Maharaj
esakal
शाही दसरा महोत्सवाचे उद्घाटन – खासदार शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली व खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत दसरा चौक मैदानात नऊ दिवस चालणाऱ्या शाही दसरा महोत्सवाचे उद्घाटन झाले.
करमुक्त नवरात्रोत्सव प्रस्ताव – ‘ग्वाल्हेर’च्या धर्तीवर कोल्हापुरात नवरात्रोत्सवात वस्तू व सेवांवर करमुक्ती दिल्यास पर्यटन, खरेदी व आर्थिक उलाढाल वाढेल,’ असा प्रस्ताव खासदार शाहू महाराज यांनी मांडला.
परंपरा व भविष्यातील योजना – छत्रपती शाहू महाराजांनी सुरू केलेला आधुनिक दसरा महोत्सव राज्यातील प्रमुख महोत्सवांत समाविष्ट; पुढील वर्षी अधिक वैविध्य आणि शासन निधी मिळण्याची अपेक्षा.
Kolhapur Navratri Festival 2025 : ‘नवरात्रोत्सवात जर शहरातील सर्व वस्तू, सेवा करमुक्त केल्या, तर देशभरातून लोक या कालावधीत देवीच्या दर्शनाला आणि खरेदीला येतील. त्यातून बाजारपेठेतील चलनवलन वाढेल. पर्यटन व्यवसायालाही गती येईल’, असे प्रतिपादन खासदार शाहू महाराज यांनी केले. त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समारोहात शाही दसरा महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी खासदार धनंजय महाडिक यांची प्रमुख उपस्थिती होती. दसरा चौक मैदानात दसरा महोत्सव पुढील नऊ दिवस होणार आहे.