ST Bus Maharashtra : एसटी बसस्थानकांबाबत मोठे निर्णय; १ जूनपासून स्वच्छतागृह मोफत, ८ हजार नव्या बस, ३० रुपयात नाष्टा, मंत्र्यांची घोषणा

Pratap Sarnaik announcement Kolhapur : एसटी बसस्थानकांवरील प्रवाशांसाठी मोठा दिलासा! १ जूनपासून स्वच्छतागृह मोफत करण्यात येणार असून ८ हजार नव्या बसची भर घालण्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली.
ST Bus Maharashtra Pratap Sarnaik announcement Kolhapur

ST Bus Maharashtra Pratap Sarnaik announcement Kolhapur

esakal

Updated on

ST bus stations Free toilets June : राज्यातील एसटी प्रवाशांना मोठा दिलासा देणारे महत्त्वाचे निर्णय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी जाहीर केले. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी अनेक नवीन घोषणा केल्या. येत्या १ जूनपासून राज्यातील सर्व एसटी बसस्थानकांवरील स्वच्छतागृह प्रवाशांसाठी मोफत करण्यात येणार असून, एसटी महामंडळाच्या ताफ्यात तब्बल ८ हजार नव्या बसची टप्प्याटप्प्याने भर घालण्याचा निर्णयही घेण्यात आला. याशिवाय, बसस्थानकांवरील कॅन्टीनमध्ये ३० रुपयांत चहा-नाश्ता देणे बंधनकारक करण्यात आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com