

Mumbai CID Raids Panhala, Crore Scam Exposed
esakal
Kolhapur CID Investigation News : (राजन दळवी) : एक कोटी दहा लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी मुंबईमधील वेस्ट सायबर पोलीस स्टेशन क्राईम ब्रँचचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन गच्चे व पथकाने पन्हाळ्यातील दोघा सख्ख्या भावांना ताब्यात घेतले. इस्माईल शमशुद्दीन काझी (वय ४२ )व त्याचा भाऊ दस्तगीर शमशुद्दीन काझी (वय ५२) (दोघे सध्या राहणार पन्हाळा) अशी त्यांची नावे आहेत. बुधवारी रात्री उशिरा दोघांना त्यांच्या राहते घरातून ताब्यात घेतले. स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने ही कारवाई करण्यात आली.