

Municipal election nomination scrutiny explained
esakal
Nomination Scrutiny Day : महापालिका निवडणुकीसाठी आज शेवटच्या दिवशी अखेरच्या क्षणापर्यंत जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांची प्रचंड झुंबड उडाली. विविध पक्षांच्या उमेदवारांबरोबरच अपक्षांनीही मोठ्या संख्येने अर्ज दाखल केले. हलगी-कैताळांच्या गजरात मोठ्या संख्येने आलेल्या कार्यकर्त्यांमुळे निवडणूक कार्यालयांचा परिसर गजबजून गेला होता.