
कोल्हापूर : निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून, माजी नगरसेवक पक्ष प्रवेशाच्या तयारीत आहेत. कोणकोणत्या पक्षात जाणार याची चर्चा असली तरी चार सदस्यीय प्रभाग रचनेमुळे जोपर्यंत उमेदवारीची खात्री मिळत नाही तोपर्यंत काहीच हालचाल करायची नाही, असा अनेकांनी पवित्रा घेतला आहे. उमेदवारी मिळणार नसेल तर या पद्धतीच्या निवडणुकीत न उतरण्याच्या मानसिकतेत काहीजण आहेत. त्यामुळे ही निवडणूक अनेकांच्या अस्तित्वाची लढाई ठरणार आहे.