
Navratri In Kolhapur
esakal
मंदिरात रात्री पालखी सोहळा
दर्शन मंडपासह प्रमुख चौकात अंबाबाईचे लाईव्ह दर्शन, मंदिरात रात्री पालखी सोहळ्यालाही गर्दी
भाविकांना सुविधा
विविध सेवाभावी संस्थांकडून भाविकांना सुविधा, चारही प्रवेशद्वारांवर सुरक्षेसाठी व्यवस्था
१ लाखांहून अधिका भाविक
पारंपरिक उत्साहात घरोघरी घटस्थापना सोंगी भजन, दांडियासह सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल, पहिल्या दिवशी दर्शन घेणारे भाविक, एक लाख अठरा हजार चारशे सतरा
Kolhapur Ambabai Mandir : दुष्ट प्रवृत्तींचा संहार करून भक्तांवर आपली कृपादृष्टी ठेवणारी आदिमाया, आदिशक्ती करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून मंगलमय वातावरणात प्रारंभ झाला. सकाळी साडेआठच्या सुमारास तोफेची सलामी देऊन मंदिरात घटस्थापना झाली आणि उत्सवाला प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी महाविद्या श्रीकमलालक्ष्मी माता रूपात देवीची सालंकृत बैठी पूजा बांधण्यात आली होती. संपूर्ण मंदिर पाने, फुले आणि फळांनी सजविण्यात आल्याने भाविकांना एक वेगळीच अनुभूती मिळाली.