esakal | 'राष्ट्रवादी स्वबळावर निवडणुका लढवणार'
sakal

बोलून बातमी शोधा

NCP

जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याबरोबर लवकरात लवकर बैठक घेऊन पाणीप्रश्न सोडवणार आहे.

'राष्ट्रवादी स्वबळावर निवडणुका लढवणार'

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

महागाव : 'आमचा पक्ष पुरोगामी विचारांचा पक्ष आहे. तो सर्वसामान्यांचा आहे. त्यामुळे ग्रामीण भागात पक्षबांधणीला महत्त्व देणार आहे. पुढील वर्षी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका स्वबळावर लढविणार आहोत,' अशी घोषणा आमदार राजेश पाटील (Rajesh Patil) यांनी केली. महागाव (ता. गडहिंग्लज) येथे झालेल्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, कार्याध्यक्ष अनिल साळोखे उपस्थित होते.

आमदार पाटील म्हणाले, 'पक्ष मोठा करण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांची आहे. पक्षाच्या पाठबळाच्या जोरावरच आतापर्यंत चंदगड मतदारसंघात दोनशे कोटींची कामे मंजूर केली. (NCP) भविष्यात पूर्व भागातील पाणीप्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्य आहे. जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याबरोबर लवकरात लवकर बैठक घेऊन पाणीप्रश्न सोडवणार आहे. रखडलेले प्रकल्प व पुनर्वसनाचे काम लवकरच पूर्ण करणार आहे.' (kolhapur News)

हेही वाचा: राजू शेट्टींच्या जलसमाधी आंदोलनासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

ए. वाय. पाटील म्हणाले, 'पक्ष बांधणी चांगल्या प्रकारे होण्यासाठी पदाधिकाऱ्यांची निवड व कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला आहे. पक्षाशी एकनिष्ठ राहून काम करा. भविष्यात होणाऱ्या निवडणुकांसाठी एकमेकांच्या हातात हात घालून काम करा.' जयसिंग चव्हाण यांनी स्वागत केले. अनिल साळुंखे यांनी प्रास्ताविक केले. अमर चव्हाण व वैशाली पाटील यांची भाषणे झाली. नव्याने निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वाटप झाले.

मुकुंद देसाई, रामाप्पा करिगार, अल्बर्ट डिसोझा, दीपक जाधव, प्रकाश पताडे, राजू घोलप, शिवप्रसाद तेली, जयप्रकाश मुन्नोळी, दशरथ कुपेकर, अभय देसाई, गंगाधर व्हसकोटी, जितेंद्र शिंदे, महाबळेश्वर चौगुले, मनीषा तेली, बशीर पठाण, धनश्री चौगुले, इक्बाल काझी, बाबासाहेब पाटील, दिलीप देसाई, उदय चव्हाण, संजय नाईक आदी उपस्थित होते. सुरेश दास यांनी सूत्रसंचालन केले. बशीर पठाण यांनी आभार मानले.

हेही वाचा: चौकटीच्या बाहेर जात इचलकरंजीच्या दोन शिक्षकांचा हटके शिक्षण पॅटर्न

दुसऱ्यांचे पक्ष संपवू नका

आमदार राजेश पाटील म्हणाले, ‘‘राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. त्यामुळे आघाडीतील कार्यकर्त्यांनी दुसऱ्यांचे पक्ष संपविण्याचे काम करू नये. चंदगड मतदारसंघात असे प्रयत्न काही ठिकाणी सुरू आहेत. ते निदर्शनासही आले आहे. ही गंभीर बाब असून, पक्षश्रेष्ठींनी याची दखल घेण्याची गरज आहे.’’

loading image
go to top