esakal | व्हेंटिलेटरला आता अम्बूबॅगचा पर्याय; इचलकरंजीतील डीकेटीईच्या विद्यार्थ्यांकडून निर्मीती
sakal

बोलून बातमी शोधा

व्हेंटिलेटरला आता अम्बूबॅगचा पर्याय; इचलकरंजीतील डीकेटीईच्या विद्यार्थ्यांकडून निर्मीती

व्हेंटिलेटरला आता अम्बूबॅगचा पर्याय; इचलकरंजीतील डीकेटीईच्या विद्यार्थ्यांकडून निर्मीती

sakal_logo
By
स्नेहल कदम

निशा संपकाळ, प्रतिक्षा पाटील,ॠतुजा मोळके व बसवेश्‍वरी कोरे यांनी हा प्रकल्प बनविला आहे. याचे वैशिष्टये म्हणजे पूर्वीच्या अम्बूबॅगला दरवेळी मानवरित्या दाब दयावे लागत होते. मानवरित्या दाब देत असताना रुग्णांना ऑक्सीजनचे प्रमाण एकसारखे न जाता कमी जास्त प्रमाणात मिळत होते. पण स्मार्ट पोर्टेबल कृत्रिम अम्बूबॅगमुळे ऑक्सीजनचे प्रमाण स्वयंचलित जात असल्याने आवश्यक त्या प्रमाणात रुग्णांना ऑक्सीजनचा पुरवठा केला जातो. तसेच कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या सहवासात सातत्याने रहाणे हे धोक्याचे ठरू शकते. अशा काही अडचणी लक्षात घेता या विद्यार्थ्यांनी स्मार्ट कृत्रिम अम्बूबॅग विकसीत केले आहे. यामुळे मानवी दाब न देता यंत्राच्या सहाय्याने हा दाब अम्बूबॅगवर देता येतो.

कोरोना परिस्थीतीमध्ये मानवी शरीराचे टेम्परेचर आणि रक्तदाब खूप महत्वाचे घटक बनले आहेत. आरोग्याच्या सुरक्षिततेचा विचार करता आरोग्य सेवक व सेविकांना रुग्णांच्या जवळ जाउन टेम्परेचर आणि रक्तदाब तपासणे शक्य नसते. ही बाब लक्षात घेता या प्रकल्पामध्ये स्वंयचलित टेम्परेचर आणि रक्तदाब तपासण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. रुग्णांचे टेम्परेचर आणि रक्तदाब एका ठराविक मार्यादेपलिकडे गेले तर डॉक्टरांना तत्काळ अँडरॉईड अ‍ॅपद्वारे एक संदेश पाठविला जातो. यामुळे स्पर्शविरहीत अप्रत्यक्षरित्या रुग्णांना मॉनिटर करण्यासाठी या प्रकल्पाचा वापर मोठया प्रमाणात होवू शकतो.

अशा प्रकारे डॉक्टर, नर्सेस व आरोग्य सेवक यांच्या हिताचा व सामाजिक बांधिलकी जपत डीकेटीईच्या विद्यार्थ्यांनी स्मार्ट, पोर्टेबल, कृत्रिमअम्बु बॅग हा प्रकल्प समाजहितासाठी बनविला आहे. या प्रकल्पासाठी विद्यार्थ्यांनीना संस्थेचे संचालक प्रा. डॉ. पी.व्ही. कडोले, डे. डायरेक्टर डॉ सौ. एल.एस. आडमुठे व प्रा. संतोष सलगर यांचे मागदर्शन लाभले. संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, आमदार प्रकाशआण्णा आवाडे, ट्रेझरर आर.व्ही. केतकर, मानद सचिव डॉ सपना आवाडे व सर्व ट्रस्टी यांनी सदर विद्यार्थ्यांचे कौतुक केले.