कोल्हापुरकरांसाठी खुशखबर; महिन्याभरात होणार नाईट लॅंडिंग

Night landing facilities will be started at Kolhapur Airport
Night landing facilities will be started at Kolhapur Airport
Updated on

कोल्हापूर : एक महिन्यात कोल्हापूर विमानतळावर नाईट लॅंडिगची सुविधा सुरू केली जाईल. त्यानंतर कोणत्याही प्रकारची विमानसेवा खंडित होणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज दिली. कोल्हापूर विमानतळीवरील हैद्राबाद, तिरुपतीला जाणारी विमानसेवा अचानक रद्द केली जात आहे. यामुळे प्रवाशी व विमान कंपन्यांच्या प्रतिनिधींमध्ये अंगावर धावून जाण्याचे प्रकार घडले आहेत. या पार्श्‍वभूमीवर आज शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या लोकशाही दिनानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, आरोग्यराज्य मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, जिल्हाधिकारी दौलत देसाई, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख, आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी उपस्थित होते. 

श्री पाटील म्हणाले, ""कोल्हापूर विमानतळावर नाईट लॅंडिंगची सुविधा मिळावी यासाठी नऊ लाखांचा निधी दिली आहे. नाईट लॅंडिग सुविधा सुरू झाल्यानंतर इतर सर्व अडथळे दूर होण्यास मदत होईल. तसेच, प्रवाशांची गैरसोयही होणार नाही. ज्या वेळेला विमानसेवा निश्‍चित केली आहे. त्याच वेळेला ती सुरू राहील.' 

प्राधिकरणासाठी बैठक घेणार 
कोल्हापूर प्राधिकरणासाठी ग्रामपंचायतींची बैठक घेतली जाणार आहे. यामध्ये, सर्व सरपंच व ग्रामस्तांची मते जाणून घेतली जातील, असेही श्री पाटील यांनी सांगितले. 

पीक पाहणी सातबारावर 
पीक पाहणी सातबारावर आणण्यासाठी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे मागणी केली आहे. जिल्ह्यासह राज्यात अनेक लोकांना दुखवण्याचे काम मागील सरकारने केले आहे. त्यामुळे ऑनलाईन सातबारामध्ये ज्या त्रुटी आहेत त्या दुरुस्त करण्यासाठी नियोजन केले जाईल, असे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले. 

तक्रारदारांना मोबाईलवर संदेश 
लोकशाही दिनानिमित्त तिन्ही मंत्र्यांकडे आलेले 844 अर्जदारांना मोबाईल संदेश पाठविला आहे. संबंधित खात्याकडे हे सर्व अर्ज वर्ग केले आहेत. दरम्यान, पालकमंत्री, ग्रामविकासमंत्री आणि आरोग्यराज्य मंत्र्यांनी दिलेल्या सूचनेनुसार या सर्व अर्जांवर योग्य ते उत्तर दिले जाणार आहे. यासाठी नियोजन केले, असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे यांनी सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com