
Kolhapur Football News: दिलबहार तालीम मंडळाचा नामवंत गोलरक्षक निखिल संभाजी खाडे (वय ३४, रा. रेसकोर्स, संभाजीनगर) यांचे सोमवारी (ता. ३०) दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने कोल्हापूरच्या फुटबॉल क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, वडील व दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे.