Ichalkaranji Crime : इचलकरंजीत तलवार, कोयत्यासह दहशत माजविण्याचा प्रकार; बच्चन टोळीतील नऊ जणांना अटक

Ichalkaranji Police Case : संशयित आरोपी बच्चन याने १६ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता समाज मंदिर कंपाउंड आणि तुळजाभवानी सभामंडपाच्या बांधकामासाठी ठेकेदाराकडे दोन लाख रुपयांची खंडणी मागितली.
Ichalkaranji Crime
Ichalkaranji Crimeesakal
Updated on
Summary

बच्चन कांबळेसह टोळक्याला १२ दिवसांपूर्वी कोयत्यासह दहशत व तोडफोडप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा धारदार हत्यारांसह दहशत माजवली.

इचलकरंजी : माजी नगरसेवकाने खंडणी मागितल्याची घटना ताजी असताना शहरातील सहकारनगर परिसरात बांधकाम ठेकेदाराकडून दोन लाख रुपयांची खंडणी मागून तलवार कोयत्यासह दहशत माजविण्याचा प्रकार घडला. याप्रकरणी गावभाग पोलिसांनी (Ichalkaranji Police) बच्चन टोळीतील नऊ जणांना अटक केली आहे. याबाबतची फिर्यादी दत्ता उत्तरेश्वर शेंडगे (वय ४५, रा. सहकारनगर) यांनी पोलिस ठाण्यात दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com