कष्टाची तयारी ठेवल्याशिवाय यश मिळत नाही: माधवराव घाटगे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kolhapur

कष्टाची तयारी ठेवल्याशिवाय यश मिळत नाही: माधवराव घाटगे

कोल्हापूर : रात्री नव्हे तर दिवसा स्वप्ने पाहून ती पूर्ण करण्यासाठी कष्टाची तयारी ठेवल्याशिवाय यश मिळत नाही. 'गुरुदत्त'चे अध्यक्ष माधवराव घाटगे यांनी मिळवलेले यश याचेच उदाहरण आहे. श्री घाटगे यांनी दातृत्वाच्या भावनेतून केलेले समाजकार्य त्यांच्यातील माणुसकीची साक्ष देत असल्याचे गौरवोद्गार, उद्योगपती संजय घोडावत यांनी काढले.

येथील सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टच्यावतीने टाकळीवाडी (ता. शिरोळ) येथील श्री गुरुदत्त शुगर्सचे अध्यक्ष माधवराव घाटगे यांना 'उद्योगरत्न' पुरस्कार उद्योगपती संजय घोडावत यांच्या हस्ते देण्यात आला. अध्यक्षस्थानी सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचे अध्यक्ष अशोक दुगाडे होते.

हेही वाचा: जनवाडच्या जवानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार ; गावावर शोककळा

श्री घोडावत म्हणाले, प्रतिकूल परिस्थितीत श्री घाटगे यांनी विविध उद्योगात भरारी घेतली आहे. प्रगती करत असताना त्यांनी समाजाप्रती संवेदनाही दाखविल्या आहेत. दिवसाची स्वप्ने त्यांनी जिद्दीने पूर्ण केली आहेत. भविष्यातही त्यांनी अधिक चांगली प्रगती करावी.

सत्काराला उत्तर देताना श्री घाटगे म्हणाले, चिंचवाडसारख्या ग्रामीण भागातून जीवन घडवून आजोबा व वडीलाच्या विचाराची शिदोरी घेऊन आयुष्यात यश मिळवले आहे. त्यामुळे प्रत्येकांनी आपल्या कामाबरोबरच समाजासाठी काही तरी देणे लागतो या भावनेतून गोरगरीबसाठी मदत केली. पुण्य कर्माचे परमेश्वर त्याची उधारी कधीच ठेवत नाही. त्यामुळे प्रत्येकानी मदत केली पाहिजेत असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा: कॉंग्रेस-राष्ट्रवादीकडून शिवसेनेला दुजाभाव नाही; सेनेला झुकते माप

यावेळी विशाल महाडिक, हर्षवर्धन भुर्के, प्रदीप मांजरेकर यांच्यासह मान्यवरानी मनोगत व्यक्त केले. यावेळी संजय शेटे, गोरख माळी, विद्यानंद बेडेकर, पल्लवी कोरगावकर, अतुल पाटील, सचिन मेनन, शांताराम सुर्वे, मोहन मेस्त्री, श्रीकांत पोतनीस, तुषार अतुरकर, अजय कोराने यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Web Title: No Success Without Hard Work Madhavrao Ghatge

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :KolhapurMadhavrao Ghatge