

कोल्हापूर: भर पावसात एकमेकांचा तोल सावरत सात मनोरे रचून शिरोळ तालुक्यातील कुटवाडच्या नृसिंह गोविंदा पथकाने भाजप व धनंजय महाडिक युवा शक्तीची दहीहंडी फोडली. मनोऱ्यातील सर्वांत वरच्या थरावर असणाऱ्या राजवर्धन पाटील या बाल गोविंदाला हंडी फोडण्यात यश आले. अत्यंत उत्साहवर्धक आणि जल्लोषी वातावरणात हा दहीहंडीचा सोहळा दसरा चौक मैदानात पार पडला. विजेत्या पथकाला खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते तीन लाखांचा धनादेश देण्यात आला.