तयारीत ढिलाई, खरेदीत घाई : एवढी तयारी केली पण...

number of corona patients has reached 23000 and 700 people died in kolhapur
number of corona patients has reached 23000 and 700 people died in kolhapur
Updated on

कोल्हापूर : कोरोना रुग्णांची संख्या २३ हजारांवर पोहोचली आहे, तर ७०० लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाला आळा घालण्यासाठी तीन वेळा लॉकडाउन घोषित केले. या काळात वाढणाऱ्या रुग्णांसाठी बेडची व्यवस्था, ऑक्‍सिजन व व्हेंटिलेटरची व्यवस्था करणे आवश्‍यक होते; मात्र लॉकडाउन संपल्यानंतर कोरोना रुग्णांच्या संख्येचा विस्फोट होत आहे, दोन-तीन दिवसांतच प्रशासन ढेपाळत आहे. रुग्णांची व्यवस्था करण्यासाठी जी काही प्रशासनाकडून तयारी केली जात आहे, ती अपुरी पडत असली तरी वैद्यकीय साहित्य खरेदी मात्र थांबलेली नाही. त्यामुळे एवढी तयारी करून नेमकं काय साध्य झालं, अशीच विचारणा होत आहे.

जिल्ह्यात मार्चमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला. वाढणाऱ्या रुग्णांची उपचाराची सोय करण्याच्या तयारीसाठी जिल्ह्यात तीन वेळा लॉकडाउन केले. पहिले लॉकडाउन २३ मार्च ते १४ एप्रिल- २१ दिवसांचे, दुसरे १५ एप्रिल ते ३ मे या कालावधीत १९ दिवसांचे लॉकडाउन, तिसरे १९ ते २६ जुलै असे आठ दिवस लॉकडाउन केले. मात्र, या तीनही लॉकडाउननंतर रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली.


पहिल्या व दुसऱ्या लॉकडाउनमध्ये दररोज १ ते ३ अशी रुग्णसंख्या होती, तर तिसऱ्या लॉकडाउनमध्ये म्हणजेच १९ ते २६ जुलै काळात दररोज २२५ ते ४०० दरम्यान रुग्णसंख्या होती. ही रुग्णसंख्या दररोज ४०० पासून ९४० इतकी उच्चांकी झाली. लॉकडाउन केल्यानंतर रुग्णसंख्येचा अंदाज घेऊन बेडची संख्या वाढवणे आवश्‍यक होते. तसेच व्हेंटिलेटरची तयारी, ऑक्‍सिजन व्यवस्था करणे आवश्‍यक होते; पण जिल्हा प्रशासन पीपीई किट, मास्क, थर्मल स्कॅनर, सॅनिटायझर खरेदीत गुंतून राहिले. आयसीएमआरने जिल्हा प्रशासनाला अनेक सूचना केल्या होत्या. यात मोठ्या प्रमाणात कोविड केअर सेंटर उभारणे, ऑक्‍सिजन व्यवस्था उभी करण्यावर भर देणे आवश्‍यक होते; मात्र तसे झाले नाही. यातून कोरोना रुग्णांना बेड मिळत नसल्याने रुग्ण मृत्यू पावत असल्याची उदाहरणे दररोज समोर येत आहेत. 

मैदाने, कार्यालये ताब्यात घ्यायला हवी होती
महापालिकेच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढली आहे. खरे तर शहरातील मैदाने, मंगल कार्यालये ताब्यात घेऊन या ठिकाणी मोठी कोविड सेंटर उभे करणे आवश्‍यक होते. एकाच ठिकाणी हजार बेडचे हॉस्पिटल उभे केल्यास वैद्यकीय सेवाही एकाच छत्राखाली देणे शक्‍य झाले असते; मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याचे वैद्यकीय यंत्रणेतील अनुभवी लोक सांगू लागले आहेत.

संपादन -  अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Madhuri’s 1,160 Km Journey From Vantara to Kolhapur
Madhuri Elephant Nandani Math Return
Dahi Handi Govinda death in Shirol
Topcha Six Lane Flyover Stuck in Contractor Dispute New Tender Process May Delay the Highway Project Further
Marathi News Esakal
www.esakal.com