
कोल्हापूर : विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी शिवाजी विद्यापीठाने गेल्या दोन दिवसांत घेतलेल्या ऑफलाईन प्रवेश फेरीमुळे विद्यापीठ कॅम्पसमध्ये प्रवेशित होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. दुसऱ्या फेरीअखेर विद्यापीठातील प्रवेश क्षमतेच्या ५० टक्के जागा भरल्या आहेत. त्याने कॅम्पसवरील अधिविभागांना चांगले पाठबळ मिळाले आहे.