
अमोल सावंत
कोल्हापूर : मका, भात, ऊस उत्पादनातून शेतकऱ्यांना तुलनेने चांगला परतावा मिळतो, तर तेलबियातून म्हणावा तसा परतावा मिळत नाही. शिवाय, तेलबिया काढणीवेळी दर ठरवून पाडले जातात, हमीभाव मिळत नाही. मराठवाडा, विदर्भ, उत्तर-मध्य महाराष्ट्राच्या तुलनेत हेक्टरी उत्पादकतेत कोल्हापूर जिल्हा तेलबियांमध्ये पिछाडीवर पडला आहे.