
Kolhapur Police
esakal
Kolhapur Radhanagari Crime : राधानगरी तालुक्यातील पनोरी या गावातील एका वृद्ध महिलेचा दागिन्यांसाठी खून करून गोबर गॅसच्या टाकीत मृतदेह टाकल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे.याप्रकरणी याच गावातील दोघांना राधानगरी पोलिसांनी अटक केली असून कर्जबाजारीपणामुळे दोघा मित्रांनी हा खून केल्याचे उघड झाले आहे. श्रीमंती हरी रेवडेकर (वय ७३ ) असे मृत महिलेचे नाव असून याप्रकरणी कपिल भगवान पातले व अभिजीत मारुती पाटील (वय ३४, रा. पनोरी) यांना अटक केली आहे. अनंत चतुर्दशीच्या रात्री या दोघा मित्रांनी हा खून करून संबंधित महिलेला गोबर गॅसच्या टाकीत टाकून पूरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता.