
Omkar Elephant
esakal
ओंकार हत्तीला पकडण्याचा निर्णय – सिंधुदुर्ग व गोव्यात धुडगूस घालणाऱ्या ‘ओंकार’ हत्तीला पकडून गडचिरोलीत पाठवण्यासाठी गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटक यांचा संयुक्त निर्णय झाला असून कर्नाटकच्या प्रशिक्षित पथकाची मदत घेतली जाणार आहे.
त्रिपक्षीय समन्वय व तज्ज्ञ पथक – कर्नाटकातील सहा प्रशिक्षित हत्ती व माहूतांचे पथक गोव्यात दाखल होणार असून, प्रथम ओंकारला पकडून कर्नाटकमधील शिबिरात ठेवण्याचाही विचार सुरू आहे.
इतर हत्तींचा उपद्रव कायम – सिंधुदुर्गच्या घोटगे व शिरवल परिसरात आणखी पाच हत्तींचा कळप आहे. महाराष्ट्र सरकारकडून त्यांना पकडण्याबाबत हालचाली मंद असल्याने मोठ्या नुकसानीची भीती व्यक्त होत आहे.
Goa to Shift to Gadchiroli Elephant : सिंधुदुर्गापाठोपाठ गोव्यात धुडगूस घालणाऱ्या ओंकार हत्तीला पकडून गडचिरोली येथे पाठवण्यात येणार आहे. यासाठी कर्नाटकच्या वनविभागाची मदत घेतली जाणार आहे. हत्ती दाखल होताच गोवा सरकारने तातडीने पावले उचलली आहेत.
सिंधुदुर्गात गेली अनेक वर्षे हत्तींचा धुडगूस सुरू आहे. येथील राजकीय नेत्यांनी आणि अधिकाऱ्यांनी हा प्रश्न कायमचा सोडवण्यासाठी फारसे ठोस उपाय केले नाहीत. गेले सहा-सात महिने हत्तींनी आपला अधिवास विस्तारत कोलझर पंचक्रोशीत कोट्यवधींचे नुकसान केले.