
Omkar Elephant
esakal
हत्तींचा धुमाकूळ – केर व कोलझर परिसरात पाच हत्तींच्या कळपाने पुन्हा बागायतींचे मोठे नुकसान केले असून, ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.
ओंकार टस्करची दहशत – कळपातून बाहेर पडलेला ‘ओंकार’ टस्कर हत्ती कधी गोवा, तर कधी सिंधुदुर्गात येऊन शेतपिके उद्ध्वस्त करतो आहे.
वनविभागाचा पेच – ग्रामस्थ पुनर्वसनाची मागणी करत आहेत; मात्र वनविभाग सध्या फक्त हुसकावण्याचे काम करतो आहे, त्यामुळे लोकांचा संयम सुटत चालला आहे.
Elephants Challenge Forest Department : केर परिसरात धुडगूस घालणारा पाच हत्तींचा कळप आज कोलझर येथे दाखल झाला. आल्या आल्या बागायतीचे नुकसान सुरू केले. दोन महिन्यांपूर्वी याच भागात कळपाने कोट्यवधींची हानी केली होती. बांद्याजवळ धुमाकूळ घालणाऱ्या ओंकार टस्कराचा वावर सातोसे आणि कास गावात होता. या संकटामुळे सिंधुदुर्ग वनविभागासमोर दुहेरी पेच निर्माण झाला आहे.