
Gram Sabha Shaktipeeth Highway Resolution : स्वातंत्र्यदिनी १५ ऑगस्ट रोजी शेतकरी आपल्या शिवारात तिरंगा झेंडा फडकवून ‘शक्तिपीठ’ विरोधी नारा देणार आहेत. तसेच महामार्गाच्या विरोधात ग्रामसभांमध्ये ठराव करुन ते सरकारला पाठविले जातील. त्याचबरोबर बुधवारी (ता.१३) दिल्ली येथे होणाऱ्या संयुक्त किसान मोर्चाच्या देशव्यापी आंदोलनात शक्तिपीठ महामार्गबाधित शेतकरी आपापल्या जिल्ह्यात व कोल्हापुरातील शेतकरी बिंदू चौकात सहभागी होतील, असा निर्णय आज शक्तिपीठ विरोधी संघर्ष समितीच्या ऑनलाईन बैठकीत घेण्यात आला.