esakal | मोठी ब्रेकिंग - इचलकरंजीत सापडला कोरोना पाॕझीटिव्ह रूग्ण 
sakal

बोलून बातमी शोधा

one corona positive patient in kolhapur ichalkaranji

शहरात यापूर्वी सर्वात मोठा धोका कर्नाटक कनेक्शनचा  होता. ज्या भागात रुग्ण आढळला आहे, त्या भागात यापूर्वी विजापूर येथील काही कोरोना बाधित व्यक्तीशी संपर्क आल्याच्या कारणावरून हा भाग सील करण्यात आला होता.

मोठी ब्रेकिंग - इचलकरंजीत सापडला कोरोना पाॕझीटिव्ह रूग्ण 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

इचलकरंजी : येथील एकजणाचा कोरोना अहवाल आज पाॕझीटिव्ह आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डाॕ योगेश साळे यांनी दिली.
 १७ एप्रिल रोजी या व्यक्तीचा स्वॕब घेतला होता त्याचा अहवाल आज पाॕझीटिव्ह आला. त्याची प्रवासाचा इतिहास तसेच त्याच्या सहवासातील व्यक्तींबाबतची माहिती घेण्यात येत आहे.

ही व्यक्ती शहरातील कोले मळा परिसरातील असून यामुळे इचलकरंजी शहरातील यंत्रणा वेगाने कामास लागली आहे.

शहरात यापूर्वी सर्वात मोठा धोका कर्नाटक कनेक्शनचा  होता. ज्या भागात रुग्ण आढळला आहे, त्या भागात यापूर्वी विजापूर येथील काही कोरोना बाधित व्यक्तीशी संपर्क आल्याच्या कारणावरून हा भाग सील करण्यात आला होता. त्यावेळी सोळा जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. मात्र हे सर्व अहवाल निगेटिव आले होते. 

याच परिसरातील साठ वर्षाची व्यक्ती आज पॉझिटिव आढळली. चार दिवसापूर्वी ही व्यक्ती चक्कर येत असल्याच्या कारणावरून शासनाच्या आयजीएम रुग्णालयात दाखल झाली होती. दोन दिवसापूर्वी त्याचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. सकाळी त्याचा अहवाल आला आहे.

दरम्यान, हा परिसर पालिकेच्यावतीने तातडीने सील करण्यासाठी यंत्रणा कामाला लागली आहे. 

हे पण वाचा - कोल्हापूर ; त्या कंटेनरमधील आणखी एक जण कोरोना पाॅझिटिव्ह

हे पण वाचा - लॉकडाउननंतर सोने गुंतवणूक फायद्याचीच...!  

हे पण वाचा - तेरा चौदा वाढप्यांना नदीकाठाचा आधार

loading image
go to top