Ravindra Mane
Ravindra ManeSakal

सावत्र आईच्या खूनप्रकरणी एकास जन्मठेपेची शिक्षा

मालमत्तेच्या वादातून सावत्र आईचा खून केल्याप्रकरणी एकास जिल्हा न्यायालयाने दोषी ठरवले. त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

कोल्हापूर - मालमत्तेच्या वादातून सावत्र आईचा (Mother) खून (Murder) केल्याप्रकरणी एकास जिल्हा न्यायालयाने (Court) दोषी ठरवले. त्याला जन्मठेपेची शिक्षा (Life Imprisonment) सुनावली. रवींद्र पांडुरंग माने (वय ४१, रा. पळसंबे, ता. गगनबावडा) असे त्याचे नाव आहे. सरकारपक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता ॲड. अमित महाडेश्वर यांनी काम पाहीले.

पळसंबे येथे प्रगती पाडुंरंग माने (वय ६८) राहत होत्या. रवींद्र माने याच्या त्या सावत्र आई होत्या. त्या दोघांच्यात मालमत्तेच्या कारणावरून वाद होता. प्रगती माने या ऑक्टोबर २०१८ मध्ये प्रापंचिक साहित्य घेऊन नातेवाईकांसह गेल्या होत्या. त्या पळसंबे गावातील घरात २१ जानेवारी २०१९ रोजी पुन्हा आल्या. याचा राग मनात धरून रवींद्रने पारळी (कोयता) ने सावत्र आईवर हल्ला करून त्यांचा खून केला. यासंबधी त्यानेच दिलेल्या फिर्यादेनुसार गगनबावडा पोलिस ठाण्यात त्याच्यावर खूनाचा गुन्हा नोंद झाला. याचा तपास तत्कालिन पोलिस निरीक्षक बी. डी. सुर्यवंशी यांनी केला.

या खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधिश (क्रमांक २) बी. डी. शेळके यांच्या न्यायालयात सुरू झाली. सरकारपक्षातर्फे ॲड. अमित महाडेश्वर यांनी १२ साक्षीदार तपासले. रवींद्रच्या फोनचे कॉल डिटेल्स्, त्यावरून त्याने घटनेदिवशी कुडित्रे, पळसंबे, साळवण पासून गगनबावडा पोलिस ठाण्यापर्यंत केलेला प्रवास, जप्त केलेले एस.टी.बसचे तिकीट, हत्यार, कपड्यावरील रक्ताचे डाग, त्याचे डीएनए पृथ्थकरण याबाबी युक्तीवादात मांडल्या. न्यायालयाने दोन्ही बाजूच्या युक्तीवादानंतर रवींद्रला जन्मठेप आणि पाच हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. सरकारपक्षाला ॲड. गजानन कोरे, ॲड. प्रशांत कांबळे, पैरवी अधिकारी पोलिस हवालदार सागर माने यांचे सहकार्य मिळाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com