दिवाळीनिमित्त एसटीच्या एक हजार विशेष जादा फेऱ्या  

One thousand special extra rounds of ST for Diwali
One thousand special extra rounds of ST for Diwali
Updated on

नवेखेड :दिवाळी सणानिमित्त होणारी संभाव्य प्रवासी गर्दी लक्षात घेऊन एसटी महामंडळातर्फे राज्यभरात ११ ते २२ नोव्हेंबर अखेर दररोज सुमारे एक हजार विशेष जादा फेऱ्यांची नियोजन केले ची माहिती महामंडळाचे अध्यक्ष ऍड अनिल परब यांनी दिली आहे. 


या ज्यादा फेऱ्या  राज्यभरातील प्रमुख बसस्थानकावरून सुटणार आहेत. त्या टप्प्याटप्प्याने रक्षणासाठी उपलब्ध करण्यात येणार आहेत. दरवर्षी महामंडळामार्फत दिवाळी सणानिमित्त गर्दी लक्षात घेऊन नियमित बसफेऱ्या व्यतिरिक्त जादा फेऱ्या सोडण्याचा येतात. त्यानुसार यंदाही एसटी महामंडळाने जादा बस फेरयांचे नियोजन केले आहे. राज्य शासनाने केलेल्या निर्देशानुसार कोविड १९चा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी आवश्यक त्या सूचना व नियमांचे काटेकोर पालन करीत सुरक्षित प्रवासी वाहतूक करण्याचे आदेश महामंडळाच्या मुख्यालयातून प्रश्न एसटी प्रशासनाला देण्यात आले आहेत.

प्रवाशांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन दिवाळी सणानिमित्त होणारी जादा वाहतूक निर्विघ्न निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी आवश्यक त्या सूचना महामंडळाच्या वाहतूक विभागामार्फत स्थानिक आगारांना देण्यात आले आहेत. त्यानुसार प्रत्येक विभाग व आगाराने प्रवासी गर्दीचा मार्ग निश्चित करून जादा वाहतुकीचे नियोजन केले आहे.

संपादन - धनाजी सुर्वे  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Kini Toll Plaza Traffic update
Sonam Maskar Silver Medal kolhapur
Maharashtra Weather Update
Maharashtra Sugar Season 2026
Marathi News Esakal
www.esakal.com