

Ichalkaranji IPL Betting raid
esakal
youth involved in betting : इचलकरंजी शहरातील इंडस्ट्रियल इस्टेट परिसरात फूटवेअर गोडावूनमध्ये सुरू असलेल्या ‘आयपीएल’ क्रिकेट सामन्यावर ऑनलाइन सट्टेबाजी करणाऱ्यांवर धडक कारवाई करत सहा जणांना ताब्यात घेतले. रविवारी सायंकाळी केलेल्या या कारवाईत तब्बल ५८ लाख ९० हजार २३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, यामध्ये महागडे मोबाईल, लॅपटॉप, रोख रक्कम, तसेच तीन आलिशान चारचाकी वाहनांचा समावेश आहे, अशी माहिती अप्पर पोलिस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी दिली.