esakal | कोरोना प्रतिबंधक लस संपल्या; नवा साठा आज येणार
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोना प्रतिबंधक लस संपल्या; नवा साठा आज येणार

कोरोना प्रतिबंधक लस संपल्या; नवा साठा आज येणार

sakal_logo
By
शिवाजी यादव

कोल्हापूर : जिल्ह्यातील बहुतेक सर्व केंद्रावर कोरोना प्रतिंबधक लस संपल्या आहेत. त्यामुळे दिवसभरात आज लसीकरण बंद राहिले. सोमवारी (3) लस येण्याची शक्‍यता आहे. त्यानुसार लसीकरण सुरू होईल, तर 18 ते 44 वयोगटातील प्रायोगिकतत्वावर असलेले लसीकरण मात्र सुरू आहे. यात ऑनलाईन नोंदणी असलेल्यांना लसीकरण केले जात आहे. त्यामुळे गर्दी टाळण्यास मदत होत आहे, अशी माहिती जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. फारूक देसाई यांनी दिली.

जिल्ह्यातील सर्व लसीकरण केंद्रावर गुरूवारी जवळपास 35 हजार कोरोना प्रतिबंधक लस पाठविल्या होत्या. त्यानुसार शुक्रवारी दुपारनंतर तर काही ठिकाणीवर सकाळपासून लसीकरण सुरू झाले. पाच हजारांवर व्यक्तींना पहिला, तर शनिवारी उर्वरित 12 हजारांवर व्यक्तींना दुसरा डोस दिला. दुपारनंतर बहुतेक केंद्रावर लस संपल्या. त्यामुळे बहुतेक केंद्रावर आज दिवसभरात लसीकरण ठप्प झाले.

हेही वाचा: नियम फक्त जनतेला, राजकारण्यांना नाही; गोकुळ निवडणुकीत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

साडे सात लाखांचा टप्पा पूर्ण

जिल्ह्यात जानेवारी 2021 पासून कोविड -19 प्रतिबंधक लसीकरण सुरू झाले. पहिल्या टप्प्यात हेल्थ केअर वर्कर, फ्रंटलाईन वर्कर, त्यानंतर 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक तसेच 45 वर्षावरील व्यक्तींचे लसीकरण सुरू झाले. त्यापाठोपाठ 18 ते 44 वयोगटातील लसीकरणही सुरू झाले. रविवारपर्यंत जवळपास साडे सात लाख व्यक्तींच्या लसीकरणाचा टप्पा जिल्ह्यात पूर्ण झाला आहे, तर 18 ते 45 वयोगटातील 22 लाख व्यक्तींना लसीकरण करण्याचे नियोजन आहे. मात्र, पुढील सुचना व लसीचा साठा येण्याची प्रतीक्षा आहे.

18 ते 44 वयोगटात लसीकरण

शिरोळ ग्रामीण रूग्णालय, वसाहत रूग्णालय गांधीनगर, ग्रामीण रूग्णालय कागल, प्राथमिक आरोग्य केंद्र भेडसगाव, भगवान महावीर दवाखाना विक्रमनगर येथे 18 ते 44 वयोगटातील व्यक्तींसाठी दररोज 200 प्रमाणे लसीकरण होत आहे. शनिवारी 363 व्यक्तींनी तर आज 915 व्यक्तीनीही लस घेतली. रोज सरासरी 1000 व्यक्तींना ऑनलाईन नोंदणीनुसार लस देण्यात येणार आहे. सुरवातीला प्रायोगिक तत्वावर निश्‍चित केलेल्या केंद्रावरच हे लसीकरण होणार आहे. त्यासाठी एकूण 7 हजार 500 लस आल्या आहेत.

हेही वाचा: 'गोकुळ'चे रणांगण : निकालाचे आडाखे बांधण्यास सुरूवात; कार्यकर्ते लागले कामाला

loading image