कोल्हापूर : जिल्ह्यातील २८ महाविद्यालयांत ३० रोजी ऑनलाईन मतदान

यिनची अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची निवडणूक
मतदान
मतदानSakal

कोल्हापूर : सकाळ माध्यम समूहाच्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कची (यिन) महाविद्यालयीन अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक जसजशी जवळ येईल, तसतशी मतदारांची उत्सुकता ताणली जात आहे. कोण अध्यक्ष व कोण उपाध्यक्ष होणार?, याकडे त्यांचे लक्ष लागले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील २८ महाविद्यालयांत ३० नोव्हेंबरला ऑनलाईन मतदान होईल. दरम्यान, निवडणुकीचा हा पहिला टप्पा असून, दुसरा टप्पा पुढील महिन्यात असेल.

यिनची निवडणूक जाहीर होताच महाविद्यालयीन तरुणाईचे लक्ष निवडणुकीकडे लागले. अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी इर्षेने निवडणूक रिंगणात उतरण्यासाठी तरुणाईने कंबर कसली. इच्छुक उमेदवारांनीही जोरदार प्रचार करत निवडणुकीची रंगत वाढवली आहे. प्रत्येक महाविद्यालयातून प्रत्येकी चार उमेदवारांचे अर्ज निवडणुकीसाठी दाखल झाले आहेत. निवडणुकीचा जाहीर नामा त्यांच्याकडून जाहीर झाला आहे. स्वतःची छायाचित्रे असलेले फलक त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ईर्षेने पण तितक्याच मैत्रीपूर्ण पद्धतीने त्यांचे प्रचाराचे तंत्र कौतुकाचे ठरले आहे. वर्गा-वर्गात जाऊन मित्र-मैत्रिणींशी संवाद साधून मताधिक्य मिळवण्यासाठी त्यांचे नियोजन सुरू आहेत.

मतदान
Corona Update : राज्यात 889 नवीन रुग्ण तर 17 रुग्णांचा मृत्यू

दुसऱ्या टप्प्यात निवडणुकीची तारीख लवकरच दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या निवडणुकीची उत्सुकता तरुणाईत दिसत आहे. या टप्प्यातील मतदानाची तारीख लवकरच निश्चित केली जाणार असून, अधिक माहितीसाठी विभागीय अधिकारी अवधूत गायकवाड (९९७५१३१२७०) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.

''सकाळ''ने यिनचा चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आहे. राजकारणात उतरु पाहणाऱ्या तरुणाईसाठी हे व्यासपीठ महत्त्वपूर्ण आहे. या निवडणुकीत मी उमेदवार असून, मतदान प्रक्रिया मला अनुभवता येणार आहे."

- वैष्णवी संजय टेंबुगडे, उमेदवार, सायबर वुमेन.

"तरुणाईच्या नेतृत्वाला भक्कम बळ देणारे यिनचे व्यासपीठ आहे. यिनतर्फे होत असलेली निवडणूक निश्चितच कौतुकास्पद असून, त्यात तरुणाई भाग घेऊन लोकशाही प्रक्रिया समजून घेत आहे, हेच महत्त्वाचे आहे."

- डॉ. विजयसिंह घोरपडे, प्राचार्य, भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ इंजिनियरिंग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com