

Devotees throng Jyotiba Hill in Kolhapur; temple peak turns pink with gulal as 1.5 lakh pilgrims offer prayers.
Sakal
जोतिबा डोंगर : येथे दीपावलीच्या सुट्यांच्या निमित्ताने जोतिबा डोंगरावर दररोज लाखाच्या घरात भाविक येत आहेत. आज रविवार असल्यामुळे महाराष्ट्र, कर्नाटक राज्यांतील सुमारे दीड लाख पर्यटक व भाविकांनी जोतिबा देवाचे दर्शन घेतले. पहाटे पाचपासून भाविक डोंगरावर दाखल होण्यास सुरुवात झाली. सकाळी दहा वाजता, तर डोंगर हाऊसफुल्ल झाला. लाखो भाविकांनी मंदिराच्या शिखर, पालखीवर गुलाल खोबऱ्याची उधळण केली.