Kolhapur News: रविवार ठरला भाविकांचा ‘दर्शन’वार; अडीच लाख भाविकांनी घेतले दर्शन,यंदाच्या नवरात्रोत्सवात विक्रमी गर्दी

Record Crowd at Navratri: शहराच्या मध्यवस्तीतील पार्किंगच्या जागाही वाहनांच्या गर्दीने भरून गेल्या. सकाळी आठच्या सुमारास दर्शनरांग भरून गेली. दुपारी तीनपर्यंत कमी अधिक प्रमाणात असेच चित्र राहिले. सायंकाळी सातपर्यंत दोन लाख ४५ हजार ७२९ भाविकांनी श्री अंबाबाईचे दर्शन घेतले.
Lakhs of devotees gathered at the temple on Sunday for Navratri darshan, creating a record turnout.

Lakhs of devotees gathered at the temple on Sunday for Navratri darshan, creating a record turnout.

Sakal

Updated on

कोल्हापूर: नवरात्रोत्सवाच्या सातव्या दिवशी रविवारी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी देशाच्या कानाकोपऱ्यांतून भाविकांची अलोट गर्दी झाली. विक्रमी संख्येने आलेल्या भाविकांची दर्शनासाठी लागलेली रांग जुना राजवाडा पोलिस ठाण्याच्या समोरील दर्शनरांगेपर्यंत पोहोचली. सकाळी नऊपर्यंत रांग तेथेच होती. नंतर मात्र दर्शनरांगेने वेग घेतला आणि दिवसभर दर्शनरांग सरलष्कर भवन परिसरातच होती. तर शहराच्या मध्यवस्तीतील पार्किंगच्या जागाही वाहनांच्या गर्दीने भरून गेल्या. सकाळी आठच्या सुमारास दर्शनरांग भरून गेली. दुपारी तीनपर्यंत कमी अधिक प्रमाणात असेच चित्र राहिले. सायंकाळी सातपर्यंत दोन लाख ४५ हजार ७२९ भाविकांनी श्री अंबाबाईचे दर्शन घेतले. दत्त मंदिरासमोरील मुखदर्शन रांग, तर दिवसभर भाविकांनी फुलून गेली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com