
Panchganga River : कोल्हापूर जिल्ह्यात मागच्या ३ दिवसांत झालेल्या पावसाने पूरस्थिती निर्माण झाली आहे. पंचगंगा नदीने धोका पातळी गाठल्याने जिल्हाधिकाऱ्यांसह आपत्ती व्यवस्थापन विभागाने चांगलीच कंबर कसली आहे. जिल्ह्यातील अनेक मार्ग बंद आहेत तर काही ठिकाणी नागरिकांचे स्थलांतर सुरू आहे.