
Almatti Dam Water Release : रात्रभर पावसाची रिपरिप कायम असल्यामुळे आज सकाळी पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडून धोक्याच्या पातळीकडे धाव घेतली आहे. सकाळी अकराच्या सुमारास पंचगंगेची पाणी पातळी ४० फूट एक इंचावर पोहचली आहे. ३९ फूट इशारा तर ४३ फूट धोक्याची पातळी आहे. राधानगरी धरण क्षेत्रातील पाऊस ओसरल्यामुळे स्वयंचलित ७ दरवाजा पैकी चार दरवाजे बंद झाले आहेत. अलमट्टी धरणाचा विसर्ग सकाळी नऊ वाजल्या पासून २ लाख वरून अडीच लाख क्युसेक्स करण्यात आला आहे. जिल्ह्यात आज सकाळी आठ वाजता संपलेल्या चोविस तासांत सरासरी ३२ मिलीमिटर पाऊस झाला असून गगनबावडा तालुक्यात १०९ पाऊस झाला आहे.