Panhala Police Solve Kololi Case
esakal
पन्हाळा (कोल्हापूर) : कोलोली येथील शेतात कामासाठी गेलेल्या छबुताई सर्जेराव पाटील या महिलेचा खून (Kolhapur woman killed case) शरीरसुखास नकार दिल्याने झाल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी अंकुश हणमंत पाटील (वय ५१, रा. कोलोली) याला ताब्यात घेऊन पन्हाळा पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची सहा दिवसांच्या पोलिस कोठडीत रवानगी केली.