
Wild Tusker Attacks
esakal
Elephant Damages Car : रणजीत कालेकर : आजरा तालुक्यातील उचंगी येथे अचानक मध्यरात्री आलेल्या हत्तीच्या चित्काराने ग्रामस्थांची झोप उडाली आहे. गावात आलेल्या टस्कराने ग्रामस्थ रवळनाथ देसाई यांच्या चार चाकी गाडीचा अक्षरशः फुटबॉल केला. या घटनेत गाडीचा चक्काचूर झाला असून सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
मध्यरात्री गावात आलेल्या टस्कराचा रौद्र अवतार पाहून ग्रामस्थांची झोप उडाली. ग्रामस्थ देसाईंची घरासमोर उभी केलेली मारुती सुझुकी गाडी त्याने दूरवर ढकलत नेली. काही वेळ हा टस्कर गाडीशी खेळत राहिला आणि त्यानंतर हळूहळू गावातून बाहेर निघून गेला.