

Pansare Murder Case Takes New Turn After Sameer Gaikwad Death
Esakal
पुरोगामी नेते गोविंद पानसरे यांच्या खून प्रकरणातील संशयती आरोपी समीर गायकवाड याचा मृत्यू झाला आहे. सांगलीत राहत्या घरी समीर गायकवाडचा हृदयविकाराच्या धक्क्यानं मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येतेय. कोल्हापुरात १६ फेब्रुवारी २०१५ रोजी कोल्हापुरात गोविंद पानसरे यांची हत्या झाली होती. या प्रकरणात समीर गायकवाड हा संशयित आरोपी होता. त्याची जामिनावर सुटका झाली होती. त्यानंतर समीर सांगलीत राहत होता.