
Ambabai temple parking
esakal
आराम बससाठी मंदिर परिसरात प्रवेशबंदी
बसेससाठी निर्माण चौक, पंचगंगा नदीघाट, खानविलकर पंपाशेजारील १०० फुटी रस्ता, तपोवन मैदान आदी ठिकाणी पार्किंगची सोय.
चारचाकी वाहनांसाठी १९ ठिकाणी पार्किंग व्यवस्था
पुणे, सातारा, सांगली, कर्नाटक, गारगोटी, राधानगरी, कोकण, गगनबावडा व शाहूवाडी मार्गावरून येणाऱ्या वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंग ठिकाणे व मार्ग निश्चित.
व्हीआयपी वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंग
अंबाबाई मंदिराकडे येणाऱ्या व्हीआयपी वाहनांसाठी विद्यापीठ हायस्कूलसमोरील पार्किंग राखीव. सामान्य भाविकांनी या पार्किंगचा वापर न करता जवळच्या अन्य पार्किंगकडे जावे, असे प्रशासनाचे आवाहन.
Ambabai Darshan Guide : नवरात्र काळात शहरातील वाहतुकीवर परिणाम होऊ नये, यासाठी आराम बसेसना मंदिर परिसरात येण्यास मनाई केली आहे. या बसेससाठी निर्माण चौक, पंचगंगा नदीघाट, खानविलकर पंपाशेजारील १०० फुटी रस्त्यावर पार्किंग उपलब्ध केले आहे, तर चारचाकी वाहनांसाठी शहरातील १९ ठिकाणी पार्किंग व्यवस्था असणार आहे.