

Thrilling 'Hedam dance' infused in Farande Baba catches attention.
Sakal
पट्टणकोडोली : भंडाऱ्याची मुक्त उधळण, ढोल-कैताळांचा निनाद आणि ‘विठ्ठल-बिरदेवाच्या नावानं चांगभलं’च्या जयघोषाने पट्टणकोडोली आज भक्तिरंगात न्हाऊन निघाली. लाखो भाविकांच्या उपस्थितीत फरांडेबाबांच्या हेडाम नृत्याने श्री विठ्ठल-बिरदेव यात्रेच्या मुख्य सोहळ्याला प्रारंभ झाला. त्यानंतर मंदिरात झालेल्या भाकणुकीकडे भाविकांचे लक्ष लागले होते. यंदा प्रथमच हेलिकॉप्टरमधून मंदिरावर पुष्पवृष्टी करण्यात आल्याने यात्रेच्या उत्साहात भर पडली.